लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काय फरक आहे?www.marathihelp.com

लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काय फरक आहे?

१) प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (Private Limited Company)

ह्या प्रकारात कमीत कमी २ व्यक्ती असणे गरजेचे आहे. त्यांना शेअरहोल्डर किंवा भागधारक म्हणतात. जास्तीत जास्त २०० शेअरहोल्डर असू शकतात
कंपनी बनवताना कमीत कमी १,००,००० रुपये भांडवल म्हणून कंपनीत टाकणे गरजेचे असते
ह्या प्रकारची कंपनी सर्वसामान्य नागरिकांना तिचे भागधारक होण्यासाठी आमंत्रित करू शकत नाही. याचा अर्थ असा की ही कंपनी वर्तमानपत्रात / टीव्हीवर तिचे शेअर (समभाग) विकण्यासाठी जाहिरात करू शकत माही. ह्या कंपनीचे शेअर खरेदी-विक्री हे खाजगी प्रकरण असते म्हणून त्याला प्रायव्हेट म्हणतात आणि दायित्व मर्यादित असते म्हणून लिमिटेड म्हणतात
प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला स्वतःचे कायदेशीर अस्तित्व असते. कायद्याने ती एक कृत्रिम व्यक्ती असल्यासारखेच असते
सर्वसामान्य जनतेकडून ह्या प्रकारची कंपनी बॉण्ड्स किंवा कर्जाद्वारे पैसे उचलू शकत नाही
कंपनीच्या नावामध्ये प्रायव्हेट लिमिटेड (Private Limited) किंवा Pvt. Ltd. असे लिहिलेले असते. उदाहरणार्थ गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Google India Pvt. Ltd.) ही कंपनी
एक व्यक्ती सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (Private Limited Company) बनवू शकतो पण त्याला वन पर्सन कंपनी (One Person Company) किंवा ओपिसी (OPC) म्हणतात. एकच व्यक्ती हे वैशिष्ट्य प्रोप्रायटरशिप ह्या प्रकारामधून घेतले आहे. ओपिसी (OPC) साठी बाकी सर्व नियम जवळपास प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखेच असतात. ओपिसी (OPC) हा प्रकार नुकताच म्हणजे २०१३ मध्ये भारताच्या संसदेने पारीत केलेल्या कंपनीज ऍक्ट (Companies Act., 2013) कायद्यानुसार सुरु केला आहे



२) पब्लिक लिमिटेड कंपनी (Public Limited Company)

कंपनी बनवण्याच्या ह्या प्रकारात कमीत कमी ७ आणि जास्तीत जास्त कितीही शेअरहोल्डर असू शकतात
कंपनी बनवताना कमीत कमी ५,००,००० रुपये भांडवल म्हणून कंपनीत टाकणे गरजेचे असते
नावाप्रमाणेच कुठलाही सर्वसामान्य नागरिक ह्या कंपनीचा शेअरहोल्डर किंवा भागधारक होऊ शकतो. कंपनी जाहीररीत्या लोकांना तिचे शेअर विकू शकते. ह्यालाच कंपनीची समभाग विक्री किंवा पब्लिक ऑफरिंग म्हणतात. सर्वप्रथम केलेल्या समभाग विक्रीला प्राथमिक समभाग विक्री किंवा इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (Initial Public Offering) अथवा आयपिओ (IPO) म्हणतात
पब्लिक लिमिटेड कंपनी स्टॉक एक्सचेन्ज वर स्वतःचे शेअर लोकांना खरेदी-विक्री साठी उपलब्ध करून देऊ शकते त्याला कंपनी स्टॉक एक्सचेन्ज वर लिस्टेड आहे असे म्हणतात
प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखेच हिलाही स्वतःचे कायदेशीर अस्तित्व असते. कायद्याने ती एक कृत्रिम व्यक्ती असल्यासारखेच असते
सर्वसामान्य जनतेकडून ह्या प्रकारची कंपनी बॉण्ड्स किंवा कर्जाद्वारे पैसे उचलू शकते
कंपनीच्या नावामध्ये लिमिटेड (Limited) किंवा Ltd. असे लिहिलेले असते. उदाहरणार्थ इन्फोसिस लिमिटेड (Infosys Ltd.)

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 16:37 ( 1 year ago) 5 Answer 6700 +22